शिक्षणाचा व्यवसाय करणारे अनेक शिक्षणसम्राट आपणास आजकाल दिसून येतात; परंतु विद्या दान हे एक उच्च दान आहे ह्या उदात्त हेतूने पुण्यातील “श्री विद्याविकास सेवा प्रतिष्ठान” ही संस्था आज चोवीस वर्षे कार्यरत आहे.तिचे अध्यक्ष मा. श्रीकांत ग. सुतार हे रयत शिक्षण संस्थेतून सेवा निवृत्त झालेले व राष्ट्रपती परितोषिक मिळवलेलेएक आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जातता.
1999 सालापासून विद्यार्थी व शिक्षक यांच्या गुणवत्तावाढीसाठी तेसतत विविध उपक्रम राबवित आहेत. विविध स्पर्धा परीक्षांचे वर्ग चालविणे काही विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊनअभ्यासात मदत मिळवून देणे आधी उपक्रम त्यांच्या खात्यात जमा आहेत.
श्री. श्रीकांत सुतार हे शिक्षण क्षेत्रात गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष निष्ठेने विद्या दानाचे कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांबद्दल नितांत प्रेम आणि विद्यार्थ्यांच्या प्रगती बद्दल सातत्याने निर्लस प्रयत्न करण्याची त्यांची जिद्द खरोखर अभीनंदनीय आहे. सुतार सरांनी श्री विद्याविकास सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या अंतर्गत शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या नावाने शिक्षण प्रेमी शिक्षकांचा एक संघटित असा कार्यगट कार्यक्षमतेने उभा केला आहे.
“राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा योजना” या योजनेअंतर्गत पुण्यातील महानगरपालिका शाळांमधील इयत्ता आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग ते राबवित आहेत. विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय परीक्षेत बसवून त्यांना हे शिष्यवृत्ती इयत्ता बारावी पर्यंत दरमहा 1250 रुपये मिळावी यासाठी सुतार सर नि:स्वार्थ बुद्धीने आटोकाट प्रयत्न करीत आहेत. सध्या स्थितीत वर्गात सुमारे 65 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हे विद्यार्थी पुणे महापालिकेच्या सर्व उपनगरातील शाळांमधून शिक्षण घेणारे आहेत ते सर्व आर्थिक दुर्बल घटकातील आहेत त्यांना सर्व विषयांची पाठ्यपुस्तके, पूरक पुस्तकांचे संच, वह्या, लेखन साहित्य, मर्यादित विद्यार्थ्यांना माध्यम्य भोजनाची तरतूद, तज्ञ अध्यापक/प्राध्यापकांचे मानधन, प्रश्नपत्रिकांची डीटीपी/झेरॉक्स, आस्थापनाचा वाढीव खर्च हे सर्व खर्च स्व:ताच्या/संस्थेच्या द्वारे उचलून ते आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग ते राबवित आहेत.
Specific work and features
Other Activities
"VIDYA SEVA PAROMO DHARMA" is the motto of our institute. It means to provide knowledge to students as and when they require for stronger foundation of their future career . We have been in this field for pretty long 20 years. We founded this academy in the year 1998 and since then we have been providing guidance for school competitive examinations. We try to find out barriers and hurdles in the learning process and provide personal guidance for all sided development. We also provide excellent guidance by expert teachers in competitive examination at the Primary and Secondary School level. We also promote ‘Earn and Learn Scheme’for the needy college going students.
We make parents fully aware of the new streams in the education field . To promote and appreciate the teachers upto the best of their quality, we award ‘Vidyavikas Prabhodhan Puraskar’ to the devoted teachers.